CSTM वर नवे प्रतिक्षालय गृह सुरु, 10 रूपयांमध्ये तासभर करता येणार प्रतिक्षा

प्रशांत कांबळे
Tuesday, 27 October 2020

मुंबईहून लांब पल्ल्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवे वातानुकूलित नम: प्रतिक्षालय सुरू झाले आहे. प्रौढांना 10 रूपये तर 5 ते 12 वयोगटातील मुलांना 5 रूपये प्रती तास दराने प्रतिक्षालयाची सुविधा मिळणार तर 5 वर्षाखालील बालकांना कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही.

मुंबईः  मुंबईहून लांब पल्ल्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवे वातानुकूलित नम: प्रतिक्षालय सुरू झाले आहे. प्रौढांना 10 रूपये तर 5 ते 12 वयोगटातील मुलांना 5 रूपये प्रती तास दराने प्रतिक्षालयाची सुविधा मिळणार तर 5 वर्षाखालील बालकांना कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही.

विमानतळावरील प्रतिक्षालयाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या प्रतिक्षालयात अत्याधुनिक सोईसुविधा देण्यात आल्या आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक 14 ते 18 जोडल्या जाणाऱ्या कॉरिडॉरजवळ हे प्रतिक्षालय सुरू करण्यात आले आहे.

सार्वजनिक खासगी भागेदारीतून प्रतिक्षालय सुरू करण्यात आलेल्या प्रतिक्षालयात प्रवाशांना सुविधा देताना, प्रतिक्षालयामध्ये सुरूवातीला सुरक्षा अनामत म्हणून 50 रूपये घेतले जाते. तर प्रत्यक्षात 10 रूपये प्रति तास सेवा दिली जाते. त्यानंतर प्रवाशांना परत जातांना अनामत रक्कम परत केल्या जाते असे नम: प्रतिक्षालय व्यवस्थापनाने सांगितले आहे.

अधिक वाचा-  नवी मुंबईच्या विकासाला बुस्टर; प्रकल्पांना गती देण्यासाठी ६५० कोटींचा खर्च

सामानाचे निर्जंतुकीकरण होणार

मध्य रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सामानाचे निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. त्यामध्ये सामानाच्या आकारानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये सामानाला निर्जंतुकीकरण करून त्याला प्लास्टिक कोटींग केले जाणार आहे. त्याला 60 ते 80 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

या मिळणार सुविधा

या प्रतिक्षालयात सोफा, डायनिंग टेबल, स्वच्छता गृह, ग्रथांलय, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिगची सुविधा, उपहार गृह, ट्रॅव्हल किट आणि गाड्यांचे वेळापत्रक दाखवणारी एलईडी स्क्रीन अशा सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे. त्यासाठी सीएसएमटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित वेटींग रुम (प्रतीक्षालय) बनवले आहे. नॉन फेअर रेव्हेन्यू च्या अंतर्गत याची निर्मिती झाली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाश्यांना यामध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहे. तर इतर रेल्वे स्थानकावर सुद्धा अशा प्रतिक्षालयाची उभारणी करण्याचा मध्य रेल्वे विचाराधीन आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

New waiting room started on CSTM waiting can be done for an hour at Rs 10


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New waiting room started on CSTM waiting can be done for an hour at Rs 10