Crime : मुंबई विमानतळावर 6 कोटींचे सोने जप्त; डीआरआयच्या 2 कारवायांमध्ये महीलेसह चौघे अटकेत

Gold Seized
Gold SeizedSakal

मुंबई : डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 2 कारवायांमध्ये सुमारे 10 किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 6 कोटी रुपये आहे.

Gold Seized
Mumbai : मुंबईकरांना राखीव साठ्यातील दीड दशलक्ष लिटर पाणी जुलैअखेर पुरविणार; सरकारचा निर्णय

आखाती देशातून सोन्याची तस्करीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर डीआरआयने शनिवारी मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यानुसार शारजाह येथून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद उमर मोह हारून फजलवाला व फहिम सलीम वारेवरीया अशी त्यांची ओळख पटलेली आहे.

दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. तपासणीत त्यांच्याकडे सुमारे 8 किलो सोने सापडले असून त्याची किंमत 4 कोटी 94 लाख रुपये आहे. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने मुजदसर अयुब डोजकी याला ताब्यात घेतले. त्याने आरोपींना गुन्ह्यांत मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली.

मुजदसर हा गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे. फजलवाला व वारेवारा दोघेही 1 जूनला शारजाहला गेले होते.तेथून ते दोघेही सोने घेऊन आले होते. या प्रकरणामागे तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.

Gold Seized
Maharashtra No1: महाराष्ट्र पुन्हा नंबर वन! मविआ सरकारवर निशाणा साधताना फडणवीसांच्या पोस्टनं वेधल लक्ष

डीआरआयच्या दुसऱ्या कारवाईत डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर दुबईहून आलेल्या दाम्पत्याला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. दाम्पत्यापैकी अफजल अबुबकर वल्लाह याच्याकडे सुमारे 2 किलो सोने सापडले. त्याच्यासोबत असलेल्या महिलेच्या पाकिटांमध्ये सोने लपवले होते.

ते जप्त करण्यात आले असून सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अफजल विरोधात गुन्हा दाखल करून डीआरआयने त्याला अटक केली. आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये आहे. याप्रकरणी डीआरआय तपास करत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com