बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जीएसटी अधीक्षकावर गुन्हा

Crime-Scene
Crime-Scene

मुंबई - उत्पन्नापेक्षा 43 टक्के अधिक मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) अधीक्षक शरद्‌चंद्र स्वामिनाथन व त्यांच्या पत्नीच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला. त्यांना 50 हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली जानेवारी 2018 मध्ये अटक झाली होती. त्याच्या एक महिना अगोदर त्यांनी सीबीआयचे दोन अधिकारी आपल्याकडे 50 लाखांची खंडणी मागत असल्याचा आरोप करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

सीबीआयने स्वतःहून स्वामिनाथन व त्यांची पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने स्वामिनाथन यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. चौकशीत पुढे आलेल्या तथ्यांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. 1 एप्रिल 2003 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत स्वामिनाथन व त्यांच्या पत्नीच्या नावावर कार, बॅंकेतील जमा रक्कम; तसेच इतर गुंतवणूक अशी एक कोटी 18 लाख रुपयांची संपत्ती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com