
बलात्कार, फसवणूक आणि धमकी प्रकरणी मुंबईतील कथकथित सामाजिक कार्यकर्ता अटकेत..
मुंबई : मुंबईतील म्हाडा हाउसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी 50 वर्षीय बोरीवली रहिवाश्याला त2014 पासून 48 वर्षीय गृहिणीला ब्लॅकमेल, बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. मॉरिस नोरोन्हा असे आरोपीचे नाव आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आणि व्यापारी म्हणून ओळखल्या जाणार्या मौरिस नोरोन्हा यांच्यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती.आरोपीने 7 जून रोजी अंडरवर्ल्ड डॉनचे नाव घेऊन पिडीतेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिने तक्रार दाखल केली होती.
महीलेने आरोपीला दिलेले 88 लाख रुपये परत करण्यास सांगितले तेव्हा आरोपीने धमकवण्यास सुरुवात केली. आरोपीने पैसे देताना मासिक तीन टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले परंतु कधीही पैसे दिले नाहीत. अखेरीस तक्रारीनंतर आरोपी मॉरिस नोरोन्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली.
Web Title: Crime In India Alleged Social Activist Arrested In Mumbai For Rape Cheating And Intimidation Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..