अंधश्रद्धा आली अंगलट, 56 लाखाला गंडा; 4 जणांना अटक

50 करोडचा पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष
crime in india superstition fraud of 56 lakh rs 4 arrested by mumbai police
crime in india superstition fraud of 56 lakh rs 4 arrested by mumbai police sakal

डोंबिवली - सुशिक्षितांचे शहर म्हणून डोंबिवली शहर ओळखले जाते. मात्र डोंबिवलीतील नागरिक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून बुवा बाबांच्या आधीन जाऊन, लाखो रुपयांचे नुकसान करून घेत आहेत. 50 करोड चा पैशांचा पाऊस पडण्यासाठी आधी 10 टक्के रक्कम खर्च करावी लागेल असे सांगत 6 जणांनी डोंबिवली तील एका विकासकाला 56 लाखाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. अशोक गायकवाड, रमेश मुकणे, संजय भोळे आणि त्यांचा एक साथीदार यांना अटक करण्यात आली असून अजुन दोन मुख्य आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.

ठाकुर्ली चोळेगाव येथे सुरेंद्र पाटील हे बांधकाम व्यावसायिक राहण्यास असून त्यांचे दावडी गावात ऑफिस आहे. गेल्या महिन्यात सुरेंद्र यांच्याशी महेश याने संपर्क साधून तुमची आर्थिक भरभराट करून घ्यायची असेल तर आम्ही पैशांचा पाऊस पाडतो असे सांगितले. आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडणारी काही माणसे आहेत, असे सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आपण अशाप्रकारचा पाऊस पाडून घेण्यास इच्छुक असल्याचे पाटील यांनी महेशला सांगितले होते. त्यानंतर महेशने त्यांची ओळख अशोक याच्याशी करून दिली. अशोक हा नियमित पाटील यांच्या कार्यालयात येत होता. अशोकने आपला परिचित रमेश मोकळे पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून गणेश यासाठी मदत करतील, असे सांगितले होते. गणेश याने 56 लाख रुपये खर्च केले तर 50 करोडचा नोटांचा पाऊस पडेल, असे सांगितले.

पाटील यांनी या टोळक्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 56 लाख रुपयांची तजवीज करण्यासाठी पाटील यांनी घरातील सोने कल्याणमधील पारस सोनाराकडे गहाण ठेवले. गणेश धार्मिक विधी करणारा होता. गणेशने पूजा साहित्याची यादी पाटील यांना दिली. शनिवारी सकाळी पाटीदार भवन जवळील कार्यालयात पाटील यांना पूजेसाठी येण्यास सांगितले. पाटील आणि त्यांचा चालक आशीष शर्मा हे सकाळी साडे पाच वाजता पोहचले. ढोंगी बुवांमधील गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड कार्यालयात उपस्थित होते. कार्यालयावरील पाटील यांच्या घरात ढोंगी गुरूंजींनी पूजा मांडली. 56 लाखाचा बटवा कुठे ठेवला आहे याची खात्री पाटील यांच्याकडून करून घेतली. सकाळी सव्वा सहा वाजता पूजा सुरू झाली. सव्वा आठ वाजता पूजा संपली. गणेश, शर्मा गुरूजींनी पाटील यांना बाजूच्या खोलीत ध्यान मग्न होऊन जप करण्यास सांगितले.

पाटील जपाला बसताच या टोळक्याने पाटील यांनी मुलीच्या बेडरूमध्ये ठेवलेली 56 लाखाची पुरचंडी गुपचूप काढून घेतली आणि इमारतीखाली जाऊन पूजा विधी व प्रदक्षिणा मारून येतो असे सांगून गणेश, गुरूजी पळून गेले. बराच उशीर झाला तरी गुरूजी पूजेच्या ठिकाणी येत नाहीत. अशोक तेथे नाही. म्हणून पाटील यांनी परिसरात शोध घेतला. ते दिसून आले नाहीत. पाटील यांनी घरात येऊन पाहिले तर 56 लाखाची पुरचंडी गायब झाली होती. पूजापाठ करण्यासाठी आलेल्या ढोंगी बुवांनी आपणास फसविले आहे. हे लक्षात आल्यावर सुधीर पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अंधश्रध्दा निर्मूलन आणि नरबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत 4 जणांना कसारा, शहापूर येथून ताब्यात घेतले, तर दोन जनांचा शोध घेतला जात असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com