भाईंदर : कारटेप चोरणाऱ्या टोळीला भाईंदर पोलिसांकडून अटक

कारमधील महागडे टेप चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला भाईंदर पोलिसांनी अटक
crime
crimeSakal Media

भाईंदर : कारमधील महागडे टेप चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीला सुरुवातीला गोवा पोलिसांनी अटक केली होती. तपासणीत आरोपींनी भाईंदर परिसरातही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपींचा ताबा भाइँदर पोलिसांनी घेतला.

पोलिसांनी आरोपींकडून चोरण्यात आलेले लाखो रुपये किमतीचे बारा कारटेप हस्तगत कले।असून तीन जणांना अटक केली आहे.जुवेर रईस अहमद (नालासोपारा), जगन्नाथ रामनाथ सरोज (नालासोपारा) आणि प्रदीप रवळनाथ गुरव (कोल्हापूर) अशी अट कलल्या आरोपींची आहेत.

crime
ठाण्यात IPL वर सट्टा ;ठाणे पोलिसांची धडक कारवाई

यातील जुबेर आणि जगन्नाथ या दोघांवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यातही कार टेप चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आरोपी गोवा हद्दीत कार टेप चोरी करून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना सीमा भागात त्यांना गोवा पोलिसांनी अटक केली.

त्यांच्या चौकशीत माईंदरमध्येही अनेक कारटेप चोरी केल्याचे स्पष्ट झाले, आरोपींचा ताबा भाईंदर पोलिसांनी घेतला आणि त्यांना चौकशीसाठी भाईंदरला आणले. भाईंदरमध्ये एकंदर बारा कारटेप चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. | चोरी झालेल्या ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी याची खातरजमा केली आहे. आरोपींकडून चोरलेले सर्व |कारटेप हस्तगत करण्यात आल आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रदीप गवळी पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com