Crime News : 2022 सालात गुन्हेगारी जगतातील घडामोडी ज्यामुळे समाज हादरला...

2022 हे वर्ष संपणार आहे आणि या वर्षातही देशभरातून हजारो खून प्रकरणे समोर आली आहेत.
crime list of year 2022 in india political murder education medical many more
crime list of year 2022 in india political murder education medical many more esakal

मुंबई : 2022 हे वर्ष संपणार आहे आणि या वर्षातही देशभरातून हजारो खून प्रकरणे समोर आली आहेत. मात्र यावर्षी अशा काही घटना घडल्या, ज्यांनी संपूर्ण देश हादरला. या हत्या अशा होत्या की त्यांची देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा झाली.

या घटना बराच काळ वृत्तपत्रे, न्यूज वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या हेडलाइन्स राहिल्या. येथे आम्ही तुम्हाला 2022 मधील घडलेल्या गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या प्रकरणांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सर्वाधिक चर्चा झाली.

श्रद्धा वालकर खून प्रकरण

श्रद्धा वालकर खून प्रकरण हे या वर्षातील सर्वात चर्चित आणि ताजे प्रकरण आहे. या खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. या खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना कळले की, आफताबने 6 महिन्यांपूर्वी 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केली होती आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्याने हळूहळू तिच्या शरीराचे तुकडे दिल्लीतील अनेक भागात फेकले.

आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवण्यासाठी नवीन फ्रीजही खरेदी केला होता. या प्रकरणात पोलिसांपासून दूर राहण्यासाठी आफताबने अतिशय काळजीपूर्वक श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि अतिशय हुशारीने सर्व पुरावे खोडून काढले. श्रद्धाच्या वडिलांनीही आफताबच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलीने पोलिसांना कळवले होते, परंतु मुंबई पोलिसांनी वेळीच तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यावेळी महाराष्ट्रात उद्धव सरकार होते.

उमेश कोल्हे हत्या प्रकरण

अमरावतीत औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्यावर 21 जून रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान तिघांच्या टोळक्याने चाकूने हल्ला केला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मुहम्मद यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

या कारणास्तव हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. अमरावती पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत होती. पण धार्मिक वादावरुन हे प्रकरण अधिक चिघळल्याने खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची दखल घेतली असुन उमेस कोल्हे

प्रकरणाचा तपास एनआयए कडे सोपवला आणि त्यानंतर एनआयए या प्रकरणाचा खोलवर तपास करु लागली. साधरण सप्टेंबर महिन्याच्या मध्यात हे प्रकरण एनआयए कडे सोपवण्यात आलं.एनआयए कडून 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

सिद्धू मुसेवाला प्रकरण

पंजाबमधील गायक सिद्ध मुसेवाला हत्या प्रकरण या वर्षी चांगलच गाजलं. प्रकरण जरी पंजाब मध्ये घडले असेल तरी त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते .या प्रकरणी सलमान खानला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

सलमानला सिद्ध मुसेवाला सारख्या अंताला सामोरे जावे लागेल अशा आशयाच्या धमकीचे पत्र सलमान खानचे पिता सलीम खान यांना मिळाले होते. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आरोपींनी हे पत्र सलमानला दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे या हत्येमुळे संपूर्ण पंजाब नाही तर देश हादरून टाकणारा खून खटला होता.

या हत्याकांडाची आजही देशभर चर्चा होत आहे. या हत्याकांडाचा संबंध परदेशात बसलेल्या गुन्हेगारांशी जोडला जात आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली होती. गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळ्यांनी सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

फोन टॅपिंग प्रकरण

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरण राजकीय दृष्ट्या चांगलेच गाजले. रश्मी शूक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असतांना राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केले होते.

यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचा समावेश होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचा शहर पोलिस तपास करत होते. परंतु, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

कन्हैया लाल खून प्रकरण (उदयपूर, राजस्थान) :

या हत्या प्रकरणाची सुरुवात भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर दिलेल्या वक्तव्याने झाली. त्या विधानानंतर एका विशिष्ट धर्माच्या बाजूने संपूर्ण देशात द्वेषाचा विचार निर्माण झाला आणि कन्हैया लाल खून प्रकरण ही त्या विचाराची पहिलीच घटना होती. उदयपूरमध्ये दोन मुस्लिम तरुणांनी भरदिवसा कन्हैया लालची हत्या केली होती

आणि हत्येचा व्हिडिओही बनवला होता, जो नंतर सोशल मीडियावर टाकला गेला. कन्हैया लालच्या दुकानात घुसून तरुणांनी हे हत्याकांड घडवून आणले होते. रियाझ अटारी आणि गौस मोहम्मद अशी या दोन्ही आरोपींची नावे असून ते दोघेही उदयपूर येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते.

खरे तर कन्हैया लालच्या मुलाने नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, त्यानंतर या दोन्ही तरुणांनी या हत्या प्रकरणाची कहाणी रचली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

सायरस मिस्त्री अपघात

4 सप्टेंबर रोजी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे गुजरातहून मुंबईला परतत असताना पालघर जिल्ह्यात कार अपघातात ठार झाले. मर्सिडीज-बेंझ कार चालवत स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोळे हे त्यांचे पती डॅरियस पांडोळे यांच्यासह या अपघातात गंभीर जखमी झाले.

मुंबईतील रूग्णालयात दाखल झालेल्या डॉ. अनाहिता यांना नुकतेच १०८ दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यांच्या पतीला ऑक्टोबरमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

अपघात झाला तेव्हा मागच्या सीटवर असलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट घातला नव्हता. या अपघातातून धडा घेत नोव्हेंबरपासून मुंबई पोलिसांनी कार चालकांना तसेच प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com