esakal | तब्बल दोन वर्षानंतर कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा; 10 गुन्ह्यांत ताब्याची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल दोन वर्षानंतर कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा; 10 गुन्ह्यांत ताब्याची परवानगी

:गुंड रवी पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न करणा-या मुंबई पोलिसांनी अखेर 2016 च्या गजाली हॉटेल गोळीबारप्रकरणी पुजारीचा ताबा घेतला.

तब्बल दोन वर्षानंतर कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा; 10 गुन्ह्यांत ताब्याची परवानगी

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - :गुंड रवी पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न करणा-या मुंबई पोलिसांनी अखेर 2016 च्या गजाली हॉटेल गोळीबारप्रकरणी पुजारीचा ताबा घेतला. मोक्का न्यायालयाने 9 मार्चपर्यंत त्याला याप्रकरणी पोलिस कोठडी सुनावली आहे.

गेल्या एका वर्षापासून रवि पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचा कर्नाटक पोलिसांशी पञव्यवहार सुरू होता. अखेर दोन वर्षांनंतर मंगळवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने गुंड रवि पुजारीला मुंबईत आणले़. कर्नाटकमध्ये रवीवर बंगळूरूत 39, मेंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, हुबळी- धारवाज, कोलार, शिवमोगा येथे प्रत्येकी एक अशी  एकूण 90 गुन्ह्यांची नोंद आहे.  त्या खालोखाल गुजरातमध्ये 75 गुन्ह्यांची नोंद आहे. तर दोन्ही राज्यांच्या तुलनेत त्याच्यावर मुंबईत  49 गुन्ह्यांची नोंद आहे. माञ या 49 गुन्ह्यात तक्रार करणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत.  तर दाखल गुन्ह्यातील 26 गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुंड इजाज लकडावाला नंतर ही सर्वात मोठी मुंबई पोलिसांची कारवाई असल्याचे म्हटले जाते.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

 अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावाने पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013रोजी जारी करण्यात आला होता, तो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की, तो एक व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाच्या रेस्टॉरंट्स चालवितो. सेनेगल कोर्टाच्या निर्णयानुसार पुजारीचे प्रत्यर्पण केवळ कर्नाटकातील गुन्ह्यांप्रकरणी करण्यात आले होते. या तांत्रिक बाबीमुळे कर्नाटक पोलिसांकडून दोन वर्ष  पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला नव्हता . अखेर याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सेनेगलमध्ये अपिल केले होते. मुंबई पोलिसांकडे पुजारीविरोधात ज्या 10 गुन्ह्यांमध्ये पुजारीविरोधात भक्कम पुरावे आहेत. त्यागुन्ह्यांमध्ये रवी पुजारीचा ताबा देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेनेगल कोर्टाकडे केली होती. ती मागणी मान्य करण्यात आल्यानंतर मंगळवारी गजाली हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराप्रकरणी रवी पुजारीचा ताबा घेऊन मुंबई पोलिसांनी त्याला मोक्का कोर्टापुढे हजर केले. त्याप्रकरणी त्याला 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरीत 39 प्रकरणांमध्येही त्याचे हस्तांतर करण्यात यावे यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने प्रक्रिया सुर असल्याचे सहपोलिस आयुक्त(गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सांगितले.  गजाली गोळीबारात  एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पुजारी टोळीच्या सात आरोपींना त्यावेळी पोलिसांनी अटक केली होती.  हॉटेल मालकाला खंडणीसाठी धमकवण्यासाठी पुजारीने  हा गोळीबार केल्याचे बोलले जाते.

अनेक सेलेब्रीटींनाही धमकावले
  रवी पुजारीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही धमकावले होते. 2017-18मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. 2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या महत्वांच्या तब्बल दीड वर्षानंतर कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मिळणे हे मुंबई पोलिसांसाठी महत्वाचे माणले जात आहे़.  रवी पुजारीला मंगळवारी सकाळी रस्ते मार्गे सकाळी 6 वाजता मुंबईत आणण्यात आले, मुंबईत पोलिस आयुक्तालयतील गुन्हे शाखेच्या विशेष कारागृहात त्याला ठेवण्यात आले आहे.  याच कारागृहामध्ये 26/11 तील आरोपी अजमल कसाब,इजाज लकडावाला यालाही ठेवण्यात आले होते.

-------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

crime marathi breaking goon Ravi Pujari Permission for possession latest mumbai update