esakal | रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपीचे नाट्यमय पलायन; वर्षभरानंतर अटक करण्यात यश
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपीचे नाट्यमय पलायन; वर्षभरानंतर अटक करण्यात यश

जे.जे रुग्णालयात उपचारा दरम्यान सुरक्षा रक्षकाच्या हातावर तुरी देऊन पलार झालेल्या बलात्काराच्या आरोपीला अखेर अटक करण्यात आले आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपीचे नाट्यमय पलायन; वर्षभरानंतर अटक करण्यात यश

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - जे.जे रुग्णालयात उपचारा दरम्यान सुरक्षा रक्षकाच्या हातावर तुरी देऊन पलार झालेल्या बलात्काराच्या आरोपीला अखेर अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोहम्मद अख्तर सयाजुद्दीन कुरेशी(40) असे अटक आरोपीचे नाव आहे. 2019 मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी 20 मार्च 2020 मध्ये न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. त्याला टीबीच्या उपचारासाठी 9 डिसेंबर,2020 ला जे.जे. मार्ग रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी 24 तास त्याला बेडी लावलेली होती. तसेच कारागृहातील एक सुरक्षा रक्षक तेथे तैनात करण्यात आला होता. 23 डिसेंबरला जेवण्यासाठी त्याची बेडी काढली. जेवण झाल्यानंतर हात धुण्याच्या बहाण्याने तो बेसिन जवळ गेला. पाच मिनीटे झाली, तरी कुरेशी परतला नसल्यामुळे अखेर तेथील तैनात सुरक्षा रक्षकांना संशय आला.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

सुरक्षा रक्षकाने संपूर्ण वॉर्ड क्रमांक 18 शोधला असता तो कोठेच सापडला नाही. अखेर जे.जे रुग्णालयात तैनात सर्व सुरक्षा रक्षकाला याबाबतची माहिती देण्यात आली. सर्व ठिकाणी शोधल्यानंतरही कुरेशी कोठेच सापडला नाही. अखेर याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यावेळी सीसीटीव्हीच्या तपासणीत तो गेट क्रमांक 8मधून बाहेर पळाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नागपाडा परिसरात शोध घेतला असता कुरेशी कोठेच सापडला नाही. याप्रकरणाची माहिती नागपाडा पोलिसांनाही देण्यात आली त्यावेळी तेथील तडीपार विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम बोरसे यांना कुरेशी कामाठीपूरा येथील 12 व्या गल्लीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला शनिवारी अटक करण्यात आली.

-------------------------------------------

crime marathi news Dramatic escape accused during treatment hospital live updates

loading image