अश्‍लील संदेश पाठविणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - अभिनेत्रीला अश्‍लील संदेश पाठविण्याप्रकरणी पोलिसांनी गडचिरोलीतून नुकतीच एका तरुणाला अटक केली. स्वप्नील सहारे (23) असे त्याचे नाव आहे. स्वप्नीलने त्या अभिनेत्रीचा मोबाईल क्रमांक इंटरनेटवरून मिळवला होता. त्यानंतर त्याने तिला व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून अश्‍लील संदेश पाठविण्यास सुरवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या अभिनेत्रीने कुरार पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वप्नीलला गडचिरोलीतील त्याच्या घरातून अटक केली.
Web Title: crime in mumbai