Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम पित्याला अटक | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम पित्याला अटक

मुंबई : मुंबईतील बोरीवली पश्चिम परिसरात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम पित्याला एमएचबी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करीत होता.

याप्रकरणी बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी 10 वर्षांची असल्यापासून आरोपी घरात कोणीच नसताना मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.

वारंवार झालेल्या प्रकारानंतर पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी पित्याने पत्नीला खोटी माहिती दिली. त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर आरोपी अत्याचार करीतच राहिला.

या त्रासाला कंटाळून अखेर 13 वर्षांच्या मुलीने नुकतीच एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी पित्याला राहत्या घरातून अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime NewsMumbai