उल्हासनगरात लेखा विभागातील लिपिकाला ठेकेदारांची मारहाण, कामकाज बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Accountant clerk beaten contractors Ulhasnagar work stopped mumbai

उल्हासनगरात लेखा विभागातील लिपिकाला ठेकेदारांची मारहाण, कामकाज बंद

उल्हासनगर : बिलाच्या फाईल वरून दोन ठेकेदारांनी लेखा विभागातील लिपिकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना आज दुपारी उल्हासनगर महानगरपालिकेत घडली आहे.याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ठेकरदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ लेखा विभागात काम करणाऱ्या स्टाफने कामकाज बंद केले आहे. जय भारत कन्स्ट्रक्शनचे मालक संजय चंदनानी व अजय चंदनानी हे फाईल बाबत विचारणा करण्यासाठी लिपिक संदीप बिडलान यांच्याकडे गेले होते.तेंव्हा फाईल तपासतो असे संदीप म्हणाल्यावर तुझे रोजचे नाटक आहे असे म्हणून चंदनानी यांनी संदीपला घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली.

संदीपने मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याकडे चालण्यास सांगितल्यावर दोघांनीही संदीपला मारहाण केली.दोघेही मारहाण करत असल्याने संदीपनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.आरडाओरडीचा आवाज ऐकू येताच मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख अधिकारी विजय खेडकर,दीपक खेमानी व कर्मचारी धावले.घडलेल्या घटनेचा प्रकार पालिकेच्या वर्तुळात पसरताच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे,उपायुक्त आरोग्य डॉ.सुभाष जाधव यांनी लेखा विभागात धाव घेतली.वारंवार दमदाटीच्या घटना घडत असून आजची घटना गंभीर असल्याची ओरड स्टाफने केल्यावर किरण भिलारे यांच्या दलनातक कामबंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान संदीप बिडलान यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून ठेकेदार संजय चंदनानी आणि अजय चंदनानी यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Web Title: Crime News Accountant Clerk Beaten Contractors Ulhasnagar Work Stopped Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top