Amit Shah Fake Video: अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर, महाराष्ट्र काँग्रेसच्या ‘हँडल’वर गुन्हा दाखल, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Amit Shah Fake Video
Amit Shah Fake Videoesakal

Amit Shah Fake Video: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस (यूथ) सोशल मीडिया हँडलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती.(amit shah )

ज्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून बनावट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, त्याची तपशीलवार माहितीही पोलिसांना देण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांनी एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपविण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हा व्हिडीओ खोटा आहे. (amit shah viral video)

Amit Shah Fake Video
Crime News : भावाने काढला भावाचा काटा! चोवीस तासांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी

यापूर्वीच्या भाषणांदरम्यान शहा म्हणाले होते की, सरकार स्थापन होताच मुस्लिम समाजाला दिलेले असंवैधानिक आरक्षण काढून टाकण्यात येईल.

मात्र तरीही हा खोटा व्हिडीओ महाविकास आघाडीतील युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या विविध जिल्ह्यांचे एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक पेज, तसेच विविध पक्ष, सेल, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या एक्स अकाऊंटवरून प्रसारित करण्यात आला आहे.

Amit Shah Fake Video
Nashik Crime News : देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ऐवजावर डल्ला! गंगाघाटावर टोळी कार्यरत; सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीला

अशा बनावट व्हिडीओमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाची बदनामी होईल व समाजातील विविध गटांमध्ये तेढ निर्माण होईल.

त्यामुळे असे कृत्य करत जनमानसातील एकोपा व सामाजिक शांतता बिघडविण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असेही मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Amit Shah Fake Video
Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com