Crime News : कपडा व्यापाऱ्याची कोट्यवधीची फसवणूक; गुन्हा दाखल..

दक्षिण मुंबईतील तीन कपडा व्यापाऱ्यावर 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
Crime News Crores fraud of cloth merchant Case registered mumbai
Crime News Crores fraud of cloth merchant Case registered mumbaiesakal

मुंबई : दक्षिण मुंबईतील तीन कपडा व्यापाऱ्यावर 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अख्तर शेख, राकेश गोयल आणि निलोफर पेनवाला अशी आरोपीची नावे आहे. या तिघांनी तक्रारदाराकडून 5.38 कोटी रुपयांचा कपडा माल विकत घेतला परंतु त्यांना पैसे दिले नाहीत किंवा माल परत न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे.काळबादेवी येथील व्यापारी संजय जैन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

पोलीस तक्रारीनुसार 2021 मध्ये संजय जैन यांची रियाझ खान या दलालामार्फत आरोपी अख्तर शेखची भेट झाली. रियाज खानने जैन यांनी अख्तर शेख सोबत व्यवसाय करावा असा सल्ला दिला . जैन यांचा खानवर विश्वास असल्याने त्यांनी शेखसोबत व्यवसाय करण्याचे मान्य केले आणि त्याना माल पुरवला. सुरुवातीला जैन यांना ऑर्डर केलेल्या साहित्याचे पैसे वेळेवर मिळाले. तथापि, नंतर आरोपी शेखने देयके चुकवण्यास सुरुवात केली .

असे करता करता त्याची थकबाकी 1 कोटींहून अधिक झाली. जैन यांनी शेख यांच्याकडे पाठपुरावा करून पैसे देण्याची मागणी केली. सुरुवातीला शेख वेळ विकत घेत होता, पण नंतर एके दिवशी त्याने जैन यांना पैसे मागू नकोस, अन्यथा गंभीर त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. धमकी पूर्व जैन यांच्याशी व्यवहार दरम्यान आरोपी शेखने राकेश गोयल या अन्य व्यापाऱ्याची जैन यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत व्यवसाय करण्याची विनंती केली. जैन हे शेख यांच्यासोबत आधीच व्यापार करत असल्याने त्यांनी गोयल यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सुद्धा कपडामाल पुरवठा सुरू केला.

तथापि, गोयल यांनीही सुरुवातीला ऑर्डरचे नियमित पेमेंट केले, परंतु नंतर त्यांनी सुद्धा देयक चुकवायल सुरुवात केली. जैन यांच्यासोबत आरोपी गोयल ची थकबाकी 2 कोटींहून अधिक झाली. नंतर, जैन यांनी गोयल यांच्याकडे कठोरपणे पाठपुरावा केल्यावर, त्यांनी जैन यांना 1 कोटीचे तीन धनादेश दिले, परंतु ते बँकेत वटले नाहीत . जैन यांनी गोयल यांना फोन केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जैन यांनी शेख यांच्याशी संपर्क साधून त्यांना गोयल यांच्यासोबतचा व्यवसायातील वाईट अनुभव सांगितला.परंतु त्याने मदतीस नकार दिला. अशाच प्रकारची फसवणूक गोरेगाव येथील व्यापारी निलोफर पेनवाला याने जैन यांची केली आणि तो सुद्धा आरोपी शेख यांचा निकटवर्तीय होता. अखेर पिडीत व्यापारी जैन यांनी मुंबईतील.एलटी मार्ग पोलिसांकडे या तिघांवर कलमांखाली गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com