Crime News : मुंबई हादरली! लोअर परेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime News

Crime News : मुंबई हादरली! लोअर परेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबईमधील लोअर परेल भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: वाद पेटला! अमरावतीत राज्यपाल कोश्यारींना जोडे दाखवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी...

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा: Anna Hajare : अण्णा गप्प का, असा प्रश्न...; भूखंड घोटाळ्याच्या मुद्द्यावर संजय राऊत भडकले

हा धक्कादायक प्रकार २३ डिसेंबरची असून, पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपीपैकी तीन आरोपी अल्पवयीन असून, अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर इतर तीन ओरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींनी ३० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: Corona Booster Dose : ९० लाख मुंबईकर बूस्टर डोसविना

तीन अल्पवयीन आरोपींपैक एकजण पीडित मुलीचा मित्र असल्याचे समोर आले आहे. याच मित्राने पीडितेला एक मित्राच्या घरी नेले जेथे तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.

यानंतर पीडितेने ही बाब घरच्यांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे. घटनेतील इतर आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.