

Mumbai Crime
ESakal
कल्याण : डोक्यावरील टोपी काढून ती टोपी आरोपीन स्वताच्या डोक्यात घातली. त्यानंतर हीच टोपी तक्रारदार यांनी आरोपीच्या डोक्यावरून काढून आपल्या मित्राला पुन्हा परत दिली. याच गोष्टीचा आरोपीला राग येऊन शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत आरोपीने गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथ मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.