हातात तलवारी नाचवित दहशत माजवित होते; पोलिसांनी आवळल्या मुसक्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news mumbai frightening with swords in hands police action arrest criminals dombivali

हातात तलवारी नाचवित दहशत माजवित होते; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

डोंबिवली - हातात उघड्या तलवारी व धारदार शस्त्र घेत रस्त्यात दिसेल त्याला मारहाण, बंद घरांच्या दरवाजावर शस्त्रांनी ठोकत दहिसर ठाकुरपाडा परिसरात काही तरुण मध्यरात्री दहशत माजवीत होते. याची माहिती मिळताच शीळ डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या असून एकाचा शोध पोलीस घेत आहेत. जावेद सलीम शेख उर्फ डीजे (वय 39), दिलावर उर्फ रुबेल फरीद शेख (वय 27), शाहिद नासीर शेख (वय 22) आणि साद अहमद उर्फ सोनू नासीर शेख (वय 24) अशी अटक आरोपींची नावे असून मारिया जावेद खान याचा पोलीस शोध घेत आहेत.

दहिसर ठाकुरपाडा परिसरात राहणारा डीजे, दिलावर, सोनू, शाहिद, साद आणि मारिया हे मंडळी जमवून परिसरात दहशत माजवित होते. शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 3 च्या सुमारास ही मंडळी गावात सार्वजनिक ठिकाणी हातात उघड्या तलवारी व धारदार हत्यार घेऊन फिरत होते. रस्त्यात दिसेल त्याला विनाकारण मारहाण करत, बंद घरांच्या दरवाज्यावर शस्त्रानी बडवावडव करीत, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करीत होते. याची माहिती शीळ डायघर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस नाईक कृष्णा बोराडे यांच्या तक्रारीनुसार 5 जनां विरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मारियाचा शोध घेतला जात असल्याची माहिती शीळ डायघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस यांनी दिली.