प्रेयसीची हत्या करणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news not returning lending money boyfriend kill girlfriend police arrest accused mumbai
प्रेयसीची हत्या करणारा अटकेत

प्रेयसीची हत्या करणारा अटकेत

मुंबई : उसने घेतलेले पैसे परत करत नसल्याचा मनात राग ठेऊन प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला अवघ्या आठ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेचा गळा धडावेगळे करून तुकडे गोणीत भरून माहीम रेल्वे स्थानक परिसरात रुळावर फेकून देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आठ तासांच्या आत आरोपीला जेरबंद केल्याचे जीआरपीचे डीसीपी संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले. विकास खैरनार असे या आरोपीचे नाव आहे. मृत ३० वर्षीय महिला गोरेगाव-दिंडोशी परिसरातील रहिवासी होती. ती खासगी कंपनीत काम करत होती.

या महिलेने खैरनारकडून उसने पैसे घेतले होते; मात्र पैसे परत करत नसल्याचा राग त्याला होता. पोलिसांनी गोरेगाव येथील पत्त्यावर तपास करताना महिलेच्या कामाच्या ठिकाणाची माहिती घेतली. त्यावरून पोलिसांनी चौकशी करताना सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. या दरम्यान सॅटेलाईट टॉवर येथे हाऊस किपिंगचे काम करणारा विकास खैरनार याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान विकासने गुन्हा केल्याचे कबुल केले. विकासने २३ मे रोजी महिलेचा गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह प्लास्टिकच्या तीन गोण्यांत कोंबून तो कचरा असल्याचे भासवत टॉवरच्या बाहेर काढला. रिक्षाने गोरेगाव रेल्वे स्थानक, तेथून चर्चगेट स्लो लोकलने माहीम रेल्वे रुळावर फेकल्याचे त्याने कबूल केले.

Web Title: Crime News Not Returning Lending Money Boyfriend Kill Girlfriend Police Arrest Accused Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top