Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर

घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत; पण किरकोळ बाजारात मात्र चढ्यादराने विक्री होत आहे |Prices of vegetables in the wholesale market are stable; But the retail market is selling at high prices.
Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर

Navi Mumbai: दरवर्षी उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी असते. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढलेले पाहायला मिळतात. मात्र, यंदा उन्हाळ्यातही बाजारात भाजीपाल्याची आवक नियमित सुरू असूनही उन्हाळी सुटीसाठी गावी गेलेल्या ग्राहकांमुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत; पण किरकोळ बाजारात मात्र चढ्यादराने विक्री होत आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नवी मुंबई, मुंबई आणि इतर उपनगरे यांना भाजीपाल्याचा पुरवठा होतो. सध्या वाशीच्या घाऊक भाजीपाला बाजारात ५०० गाड्यांची आवक होत आहे.

Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर
Navi Mumbai Accident : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापे शिळफाटा मार्गावर झाला अपघात

तर गेल्या काही वर्षांपासून भाजीपाल्याच्या गाड्या थेट मुंबई बाजारातही जात आहेत. अशातच मुंबई, नवी मुंबईतील नागरिक बाहेरगावी गेल्यामुळे भाजी खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या खरेदीवर झाल्याने दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शिवाय वातावरणातही उष्णता जास्त असल्याने माल साठवून ठेवता येत नसल्याने व्यापाऱ्यांकडून भाज्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे वाटाणावगळता सर्वच भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याचे चित्र आहे.

घाऊक बाजारातील सध्याची स्थिती :
भाजी दर (प्रतिकिलो)
भेंडी २६ ते ३२
दुधी भोपळा २० ते ३०
चवळी शेंग २४ ते २८
फरसबी ९ ते १०
गाजर २० ते २६

Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर
Navi Mumbai Accident : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापे शिळफाटा मार्गावर झाला अपघात

घेवडा ३५ ते ४५
कारली ३६ ते ४४
ढोबळी मिरची ३० ते ४०
शिराळी, दोडकी २६ ते ३६
सुरण ६० ते ६५
वांगी १६ ते २२
हिरवी मिरची ५५ ते ६०

Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर
Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; बांगलादेशी नागरिकांची धरपकड, कार्यवाही सुरू

एपीएमसीत भाजीपाल्याची आवक सुरळीत आहे. तसेच शाळांना सुट्या लागल्या असल्यामुळे गावी तसेच बाहेरगावी फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत.
- के. डी. मोरे, घाऊक व्यापारी, एपीएमसी मार्केट

Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर
Navi Mumbai Crime: पोलिसांनी केली मोठी कारवाई; तब्बल १० लाखांचा एमडी जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com