मुंबईच्या पॉश क्लब मध्ये चोरी करणाऱ्या इंजिनिअर चोरास पोलिसांकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Police arrest engineer thief for stealing from Mumbai posh club mumbai

मुंबईच्या पॉश क्लब मध्ये चोरी करणाऱ्या इंजिनिअर चोरास पोलिसांकडून अटक

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम येथील बॉम्बे अड्डा या क्लबमधून महागडे मोबाईल चोरल्याच्या आरोपाखाली एका २८ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून हे गुन्हे करत होते आरोपी क्लब मधील डान्स फ्लोअरवर जायचा आणि तेथील ग्राहकांचे मोबाईल फोन लंपास करायचा. पोलिसांनी आरोपीकडून महागडे तीन आयफोन जप्त केले आहेत.कांदिवली पूर्व येथील रहिवासी आरोपी अद्वैत राजन महाडिक हा पेशाने इंजिनिअर आहे. त्याचा पगार त्याच्या महागड्या जीवनशैलीला पुरत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचं लग्नही नुकतंच झालं होतं आणि त्याच्या जबाबदाऱ्याही वाढल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात बॉम्बे अड्डा येथून आयफोन चोरीला गेल्याच्या तीन घटना सांताक्रूझ पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी क्लबचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना आरोपींचा शोध घेणे अवघड वाटले कारण त्या वेळी ghatnastble सुमारे 200 लोक होते.'“सर्व घटना आठवड्याच्या शेवटी शनिवारी रविवारी घडल्या होत्या कारण तेव्हा ग्राहकांची संख्या सर्वात जास्त असते. अद्वैत क्लबमध्ये ग्राहक म्हणून जात असे आणि डान्स फ्लोअरवरील ग्राहकांचे फोन लंपास करत असे. आता पर्यंत चोरी केलेल्या फोनची किंमत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Web Title: Crime News Police Arrest Engineer Thief For Stealing From Mumbai Posh Club Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top