भंगार गोदामात छापा टाकण्यासाठी गेलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ठेवलं कोंडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Two police locked up who went for raid mumbai

भंगार गोदामात छापा टाकण्यासाठी गेलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ठेवलं कोंडून

डोंबिवली - भंगाराच्या दुकानात चौकशी करण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी याविषयी पोलीस ठाण्यात फोन करताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. याप्रकरणी 3 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शौकत शेख व इशाद बागवान अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरातील एका गोडावून मध्ये रेल्वेचे चोरी केलेलं भंगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी महात्मा फुले पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचारी भंगार ठेवलेल्या गोदामात गेले.

पोलिस आत येताच तेथे असलेल्या शौकतने शटर बंद करीत पोलिसांना कोंडून घेत बाहेरून कुलूप लावून घेतले. पोलीस कर्मचारी जयेश गोसावी आणि अन्य एका कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीसानी घटना स्थळी धाव घेत या कर्मचाऱ्याची सुटका केली. पोलिसांना कोंडून ठेवणाऱ्या शौकत शेख आणि इशाद बागवानला त्यांचा साथीदार अस्लम शेख विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौकत आणि गाळा मालक इशाद याला पोलिसांनी अटक केली आहे. चोरीचे भंगार ठेवणारा अस्लम हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली.