Crime News : घरफोडी दरोड्याच्या अनेक गुन्ह्यात आरोपी टोळीला उत्तर प्रदेश दिल्लीतून अटक

घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार
crime police action Gang accused in several cases of housebreaking and robbery arrested from Uttar Pradesh Delhi
crime police action Gang accused in several cases of housebreaking and robbery arrested from Uttar Pradesh Delhi esakal

मुंबई : भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या एक टोळीला विक्रोळी पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून अटक केली. या टोळीने मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

crime police action Gang accused in several cases of housebreaking and robbery arrested from Uttar Pradesh Delhi
Mumbai Crime: चांगला सल्ला देणे पडलं महागात ! मित्राने चिडून केला चाकू हल्ला

विक्रोळी परिसरात राहणारे दिलीप रांगणकर यावर्षी 16 मार्च रोजी दुपारी पत्नीसह टागोर नगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. काही वेळानंतर परतलेल्या रांगणकर यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील 4 लाख 16 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

crime police action Gang accused in several cases of housebreaking and robbery arrested from Uttar Pradesh Delhi
Mumbai : पावसाळ्यात मुंबईतील पूरपरिस्थितीचे आव्हान टाळण्यासाठी सतर्क राहा; इकबाल सिंह चहल

विक्रोळी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. कॅमेऱ्यातील चित्रणात आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून लतीफ खानला अटक केली. त्यानंतर फरमान अन्सारी आणि शमीम अन्सारी या दोघांना दिल्ली येथून अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी काही मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com