विनयभंग करणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

ठाणे - ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबिकानगर येथील एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला चार वर्षे तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय गंगाधर सोनावणे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत. महिलेच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी 2 मार्च 2015 रोजी त्याला अटक केली होती.
Web Title: crime in thane