लग्नास नकार; मुलीवर चाकूहल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update mumbai Refuse to marry girl was stabbed Police injured

लग्नास नकार; मुलीवर चाकूहल्ला

वडाळा : मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून संतप्त तरुणाने मुलीला रस्त्यात गाठून तिच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवल्याची घटना वडाळा पूर्व येथील बरकत अली नाका येथे बुधवारी (ता. ४ मे) घडली. प्रसंगावधान राखून या मुलीचा जीव वाचणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास यात गंभीर दुखापत झाली आहे. मुलीला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनिल बाबर (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वडाळा पोलिस ठाणे मिलिंद जाधव यांनी दिली.

वडाळा पूर्व येथील बरकत अली नाका येथे २५ वर्षीय मुलगी रस्ता ओलांडून नोकरीच्या ठिकाणी जात असताना सकाळी १०.४५ वाजण्याच्या दरम्यान आरोपी अनिल उत्तम बाबर याने तिचा हात खेचला. तिने त्याचा हात झटकल्याने त्याला राग आला आणि त्याने तिच्या पाठीमागून येऊन अचानकपणे तिच्यावर चाकूने हल्ला केला. कर्तव्यवार असलेले वडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई मयूर बंडू पाटील यांनी तत्काळ प्रसंगावधान राखून मुलीचा जीव वाचवण्याकरता आरोपीच्या दिशेने धाव घेतली.

आरोपीस रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावरदेखील चाकूने हल्ला केला. त्यात त्यांच्या हातास गंभीर दुखापत झाली आहे. मात्र पाटील यांनी वेळीच साहसाने आरोपीस अटकाव केल्याने पीडित मुलीचा जीव वाचला. मुलीस औषधोपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले आहे.

कुटुंबात वाद

मुलीच्या कुटुंबीयांकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र मुलगा पसंत नसल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाले होते. पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Web Title: Crime Update Mumbai Refuse To Marry Girl Was Stabbed Police Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top