गुजरात जेलमधून फरार गुन्हेगारास डोंबिवलीत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

criminal absconding Gujarat Jail arrested in Dombivli mumbai police

गुजरात जेलमधून फरार गुन्हेगारास डोंबिवलीत अटक

डोंबिवली - दरोड्याच्या गुन्हात गुजरात मध्ये न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या अट्टल गुन्हेगारास रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे. महेश उर्फ भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे (वय 28) असे अटक आरोपीचे नाव आहे. पॅरोलच्या रजेवर फेब्रुवारी महिन्यात बाहेर आलेला महेश हा पुन्हा जेलमध्ये परतला नव्हता. मार्च महिन्यापासून तो फरार होता. बुधवारी रात्री डोंबिवलीतील आयरे गाव परिसरात महेश हा दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार नागरिकांनी रामनगर पोलिसांना दिली होती. त्याआधारे पोलिसांनी विभागात जाऊन महेशला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. हत्यार प्रतिबंधित कायदा अंतर्गत महेश याला अटक करण्यात आली असल्याची माहिती रामनगर पोलीसांनी दिली.

डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव येथील ज्योतीनगर झोपडपट्टीतील जलकुंभा जवळ पिस्तुल बाळगून एक तरुण परिसरात दहशत पसरवित असल्याची माहिती रामनगर पोलिस ठाण्यातील पोलीसांना स्थानिक नागरिकांनी दिली. त्याआधारे पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता महेश हा दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. महेशला पोलीसांनी अटक केली असून महेश हा अट्टल गुन्हेगार आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात तो सुरत येथील कारागृहात सात वर्षापासून शिक्षा भोगत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये पॅरोलच्या रजेवर तो होता. 21 मार्च 2022 ला तो सुरतच्या कारागृहात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र तो हजर न होता फरार झाला असल्याने त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. बुधवारी रात्रीच्या वेळी रामनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यांना पोलीस ठाण्यातून कळविण्यात आले की, आयरे गावातील ज्योतीनगर झोपडपट्टीत एक तरुण नागरिकांची झोपमोड करुन, शांततेचा भंग करुन आरडाओरडा करत आहे. त्याच्या जवळ पिस्तुल आहे. तो त्याचा दुरुपयोग करुन येथे काही दुर्घटना करू शकतो, अशी माहिती मिळाली.

गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तातडीने ज्योतीनगर झोपडपट्टीत गेले. तेथे त्यांना 50 हून अधिक रहिवासी जमावाने जमल्याचे दिसले. त्या गर्दीत एक तरुण बेभान होऊन आरडाओरडा शिवीगाळ करत होते. रहिवासी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तो त्यास दाद नव्हता. हा तरुण बेभान असल्याने तो ताब्यात येणार नसल्याने पोलिसांनी पोलिसांची वाढीव कुमक मागविली. पोलिसांच्या पथकाने शिताफिने या तरुणाला अटक केली. मात्र पोलीस येण्यापूर्वीच रहिवाशांनी या तरुणाला चोप दिला होता. या मारहाणीत महेश हा जखमी झाला असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या पथकाने आयरे गाव शाळेजवळ तरुणाला कोंडीत पकडत ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याजवळ पिस्तुल कोठून आले याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Criminal Absconding Gujarat Jail Arrested In Dombivli Mumbai Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..