तलवारीसह सराईत गुन्हेगार ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मानखुर्द - गोवंडीतील शिवाजीनगर रोड क्रमांक तीनवर तलवारीसह फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शफी ऊर्फ तुफानी (वय 37) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर देवनार पोलिस ठाण्याच्या हद्दीत हत्येसह इतर तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला नुकताच एका गुन्ह्यात दोन वर्षांचा तुरुंगवासही झाला होता.

शिवाजीनगर मार्केटमध्ये भाजी विक्रेत्याकडे शनिवारी (ता. 3) मोहम्मद शफीने तलवारीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. भाजी विक्रेत्याने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तलवारीने वार करून मोबाईल व पैसे हिसकावून तो पळाला होता. ही घटना दुपारी 2.30च्या सुमारास घडली होती. भाजी विक्रेत्याने त्याच्याविरोधात तक्रार केल्यानंतर शिवाजीनगर पोलिस त्याचा शोध घेत होते. संध्याकाळी 7 वाजता एक व्यक्ती तलवार घेऊन रोड क्रमांक तीनवर तलवारीसह वावरत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षास मिळाली. त्या परिसरात पोलिस शोध घेऊ लागले. पोलिस मागावर असल्याचे समजताच त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून तलवार, मोबाईल व पाचशे रुपये जप्त करण्यात आले. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

Web Title: Criminal arrested with sword