एका तोळ्याच्या सोनसाखळीसाठी मित्राची हत्या; गुन्हेगाराला 24 तासांत अटक

राजेश दळवी
Sunday, 13 September 2020

भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात राहणाऱ्या आकाश नारायण शेलार (वय 20) या कॉलेज युवकाची हत्या शुक्रवारी झाली होती. ही हत्या त्याच्याच मित्राने केवळ सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशाने केल्याचे रविवारी उघड झाले आहे

 

पडघा : भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात राहणाऱ्या आकाश नारायण शेलार (वय 20) या कॉलेज युवकाची हत्या शुक्रवारी झाली होती. ही हत्या त्याच्याच मित्राने केवळ सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशाने केल्याचे रविवारी उघड झाले आहे. अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा तपास पडघा पोलिस व ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण लावला.

मुंबईकरांनो खबरदार! मास्क नसेल तर भरावा लागणार दंड; BMC ची कारवाई सोमवारपासून सुरू

अज्ञात मारेकऱ्याने मोबाईलवरून संपर्क करून आकाशला गावालगतच्या माळरानावर बोलावले होते. त्यानंतर त्याच्या मान व डोक्यावर लाकडी बॅटने प्रहार करून शुक्रवारी सायंकाळी निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. हत्येनंतर आकाशच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी आणि मोबाईल गायब असल्याचे निदर्शनास येताच ही हत्या चोरीसाठी झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्या अनुषंगाने स्थानिक ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे एपीआय परशुराम लोंढे, पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलिस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रवीण हबळे, पोलिस नाईक अमोल कदम, हनुमंत गायकर, सुहास सोनवणे आदींनी तपासाची सूत्रे हलवली.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप

तपासाअंती पोलिसांनी करंजोटी गावातील मयूर मोतीराम जाधव (20) या आकाशच्या मित्राला शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानेच सोनसाखळी चोरी करण्याच्या उद्देशाने आकाशला माळरानावर बोलवून हत्या केल्याचे कबूल केले. हत्येनंतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल आणल्याचे त्याने सांगितले. पडघा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांनी मयूरला अटक करून रविवारी (ता.13) भिवंडी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal arrested within 24 hours due to theft