
Crime News
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील मौजे नवागाव महसुली हद्दीत गायकवाड वाडी भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता एका बंगल्याची बेकायदा उभारणी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघा जणांवर पालिकेचे ह 'प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या पुढाकाराने अधीक्षक अर्जुन वाधमारे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना आणि नियोजन अथिनियमाने (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.