साटमच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Guru-Satam
Guru-Satam

मुंबई - कुख्यात गुन्हेगार गुरू साटम याच्या आर्थिक नाड्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. हाँगकाँगमधून त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा कृष्णकुमार बाळकृष्ण नायर ऊर्फ केविन याला खंडणीविरोधी पथकाने केरळमध्ये अटक केली. 

मुंबईतील एका व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी नायर याच्याविरोधात ‘मोक्का’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीतून मिळालेली सर्व रक्कम हवाला मार्गाने हाँगकाँगमध्ये केविनकडे जायची. हा पैसा तो गुरू साटमपर्यंत पोचवत होता. तक्रारदार व्यावसायिकाला धमकावून चार वर्षांपासून गुरू साटम खंडणी घेत होता. तक्रारदारावर यापूर्वी दुसऱ्या टोळीकडून गोळीबार झाला होता, त्यामुळे तो घाबरून साटमला नियमित खंडणीची रक्कम देत होता. त्याने एकूण ६० लाखांची रक्कम दिली होती. अखेरीस या प्रकाराला कंटाळून त्याने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com