उद्धव ठाकरेंचे सोशल मीडियावरील विडंबन महागात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विडंबन असणारी चित्रं नेटीझन्सला दिसत असतात. त्यापैकीच एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने ते शेअर केले. सकाळी साडेअकरा वाजता केलेल्या या पोस्टचे परिणाम रात्री सात वाजल्यानंतर तरुणाच्या घरापर्यंत उमटले.

संतप्त शिवसैनिकांनी संबंधित तरुणाच्या घरावर धाबा बोलताच संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये धडकी भरली होती. हा प्रकार वाऱ्यासारख्या पसरल्याने शेकडो शिवसैनिक तरुणाच्या घरी जमा झाले. परिस्थिती हाताबाहेर जाणार असे लक्षात येताच घटनास्थळी दाखल झालेले पोलिस रात्री साडेदहा वाजता तरुणाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या वेळी तरुणाने संतप्त शिवसैनिकांची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण निवळले. तर महिला शिवसैनिकांनी या तरुणाला साडी देण्याचा हट्ट केला. रात्रीचे साडेअकरापर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता.

अखेर पोलिसांच्या दालनातूनच या तरुणाने फेसबुकवर लाईव्हवर सर्व शिवसैनिकांची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण निवळले. या घटनेची कोणतेही नोंद पोलिसांनी केलेली नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांनी सदर तरुणाला बुधवारी (ता.5) सकाळ पर्यंत पोलिस चौकीतच ठेवण्यात आले होते. 

Web Title: criticism on Uddhav Thackeray on social media is become expensive