

Powai Lake Crocodile Rescue
ESakal
मुंबई : मुंबईतील पवई तलावाजवळील मोरारजी नगर भागात मंगळवारी एका दर्ग्याजवळ सुमारे सात फूट लांबीचा मगर आढळल्याने घबराट पसरली. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रहिवाशांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि प्रशिक्षित बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.