चेंबूर परिसरात कावळ्यांचा मृत्यू, नागरिक भयभीत

जीवन तांबे
Sunday, 10 January 2021

चेंबूर येथील टाटानगर वसाहतीत कावळे आणि इतर पक्षी मरून पडत असल्याचे घटना घडत आहेत.

मुंबईः चेंबूर येथील टाटानगर वसाहतीत कावळे आणि इतर पक्षी मरून पडत असल्याचे घटना घडत आहेत. परिसरातील नागरिकांना हे पक्षी का मरतात असा प्रश्न पडला आहे. 

चेंबूर येथील वाशीनाका परिसरात विविध रासायनिक कंपन्या आहेत. या कंपनीमधून धूर, वायू बाहेर पडत असल्याने चेंबूर परिसरात प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. याचे फार वाईट परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहे.

सध्या वाढते प्रदूषण, वातावरण बदल आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात विविध विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम नागरिकाप्रमाणे पक्षांवर होताना दिसत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चेंबूर, वाशीनाका, आरसीएफ परिसरात मोठ्या प्रमाणात कावळे आणि विविध पक्षी मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांच्या आजारात वाढ होते. देशात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू असताना पक्षी मरणाच्या घटना सुध्दा चेंबूर परिसरात घडत आहे. आज टाटा वसाहतीत आज एकूण 9 पेक्षा अधिक कावळे मृत आढळून आले.

पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूचे कारण काय आहे अद्याप कोणालाही कळलेले नसले तरी या पक्षाचा मृत्यू  बर्ड फ्लू, एच5एच1मुळे होत असल्याने नागरिक ही भयभीत झाले आहेत.

हेही वाचा- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

कावळे आणि पक्षी का मरतात त्याचे नमुने घेऊन लॅब मध्ये चाचणी करिता पाठविले आहे. रिपोर्ट आल्यास याबाबत माहीती मिळेल.
राजेश चातुर, सहाय्यक आयुक्त ( पशु तज्ञ )

कावळे गेल्या नोव्हेंबर महिन्या पासून मरताना दिसत आहेत. मला आतापर्यंत मेलेले कावळे पाच सहा आढळून आले आहे.  पालिकेने खबरदारीची उपाय योजना करावी आणि या पक्षाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा.
मिलिंद तळेकर ( रहिवासी )

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

crow died mumbai chembur bird flu people Scared


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crow died mumbai chembur bird flu people Scared