Navi Mumbai News: गटारीला मांसाहाराचा झणझणीत तडका;चिकन-मटणासाठी रांगा, मासळीच्या दरात किलोमागे २० ते २५ रुपये वाढ
Meat Sales: नवी मुंबईतील तुर्भे, नेरूळ, जुईनगर आणि दिवाळे मच्छी बाजारात गटारीच्या निमित्ताने खवय्यांची मोठी गर्दी होती. श्रावण महिन्यापूर्वी चिकन, मटण आणि मासळीच्या खरेदीला जोर मिळाल्यामुळे मासळीच्या भावात वाढ झाली होती.
तुर्भे : आषाढ महिन्याचा शेवट आणि गटारीनिमित्त नवी मुंबईत बुधवारी खवय्यांनी सकाळपासूनच चिकन-मटन, मच्छीविक्रेत्यांकडे गर्दी केली होती. शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे.