
मुंबई: कोरोना संसर्गाच्या भीतीने मुंबईतील उपनगरी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांचे प्रमाणही वाढत चालल्यामुळे उपनगरांतील रुग्णालयांवरील ताणही वाढला आहे.
सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांवर औषधांच्या दुकानातून गोळ्या घेऊन उपचार करण्याकडे नागरिकांचा कल असतो. सध्या मात्र असा त्रास वाढल्यास नागरिक महापालिकेच्या उपनगरी रुग्णालयांत धाव घेत आहेत. पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात कोरोनाचे 50 रुग्ण दाखल आहेत. संशयित रुग्णाना दाखल करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मुलुंडमधील अगरवाल रुगणालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.
महत्वाची बातमी : घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...
पश्चिम उपनगरातही कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपनगरांतील महापालिकेच्या रुग्णालयांना भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, या रुग्णालयांत डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
Crowds of patients with cold, cough, fever in municipal hospitals
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.