esakal | Drug Case - NCB ने एका परदेशी नागरिकाला केली अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB ने रात्री एका परदेशी नागरिकाला वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली

Drug Case - NCB ने एका परदेशी नागरिकाला केली अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आता परदेशी नागरिकांचे कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. वांद्र्यात एनसीबीने ताब्यात घेतलेली व्यक्ती परदेशी असून त्याच्याकडे एमडीएमए ड्रग्स आढळून आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईत क्रूजवर ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाली असून त्याची कस्टडी आज संपणार आहे. अरबाज मर्चंट आणि आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तसंच एनसीबीच्या कारवाईवेळी केपी गोस्वामी आणि मनिष भानुशाली हे कसे काय उपस्थित होते असाही सवाल विचारला.

क्रूझवरील छाप्यानंतर आर्यन खान आणि इतरांना अटक करणारे दोघे जण अमलीपदार्थ नियंत्रण पथकाचे (एनसीबी) अधिकारी नव्हतेच. या दोघांनी कोणत्या अधिकाराखाली कारवाई केली, असा खुलासा ‘एनसीबी’ने करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.

क्रूझवरील कारवाईवेळी उपस्थित असलेले ‘ते’ दोघे जण स्वतंत्र साक्षीदार असून सर्व पंचनामे कायदेशीर प्रक्रिया पाळूनच केले गेले आहेत, असा दावा अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर ‘एनसीबी’ने ही माहिती दिली.

हेही वाचा: कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई ; NCB चे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ बरेच अमलीपदार्थ आणि रोख रक्कम सापडली. त्यानंतर मोहक जयस्वालच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, पुढील कारवाई करण्यात आली. क्रूझ वरील छाप्यानंतर आणखी चार ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाई करताना स्वतंत्र साक्षीदार बरोबर नेण्यास परवानगी असते त्यानुसार, प्रभाकर सैल, किरण गोसावी, भानुशाली, ऑबरेज गोमेज, आदिल उस्मानी, व्ही. वेगणकर, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैज आणि मुजम्मिल इस्माईल हे सहभागी झाले होते अशी माहिती एनसीबीने दिली.

loading image
go to top