esakal | कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंचा राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंचा राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : मेळघाटमधील कुपोषणामुळे (Malnutrition) पंधरा दिवसांत चौदा बालमृत्यू (children death) झाले असून दोन गर्भवती मातांचा मृत्यू (pregnant woman death) झाला अशी माहिती आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिकादाराने दिली. यावर राज्य सरकारला (mva government) खुलासा करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

हेही वाचा: माहीम येथे प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल खुला; अपघात टाळण्यासाठी उभारणी

मेळघाटातील कुपोषणामुळे मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मागील सुनावणीला नाराजी व्यक्त केली होती. आजही याचिकादार बंडू साने आणि डॉ राजेंद्र बर्मा यांनी खंडपीठाला माहिती दिली. अद्याप या ठिकाणी सरकारने वैद्यकीय सेवा सुरळीत केली नाही अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.

मात्र सरकारकडून याचे खंडन करण्यात आले. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये राज्य सरकार आणि याचिकादारांनी लेखी खुलासा करावा, असे न्यायालयाने निर्देश दिले. राज्यातील आदिवासी भागात वैद्यकीय सेवा सुरळीत करावी आणि बालमृत्यू होणार नाही अशी यंत्रणा उभारावी, असे आदेश सरकारला दिले होते. मात्र बालमृत्यू नियंत्रणात नाही आहेत असा आरोप याचिकादारांनी केला आहे.

loading image
go to top