esakal | गर्दीच्या ढिसाळ नियोजनाबाबत मुंबई एअरपोर्टने व्यक्त केला खेद; जाहीर केली भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Airport: गर्दीच्या ढिसाळ नियोजनाबाबत व्यक्त केला खेद

Mumbai Airport: गर्दीच्या ढिसाळ नियोजनाबाबत व्यक्त केला खेद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देशातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या एअरपोर्टपैकी एक आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देशातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या एअरपोर्टपैकी एक आहे. आज या मुंबई एअरपोर्टवर तुफान गर्दी पहायला मिळाली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही मोठ्या संख्येने जमाव आणि गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना इच्छित असलेली फ्लाईट न मिळाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रवाशांनी आपली फ्लाईट मिस होण्याला यंत्रणेला जबाबदार ठरवलं आहे. सकाळी एअरपोर्टवर दिर्घकाळापर्यंत यंत्रणेला गर्दी हाताळता आली नाही. मोठ्या संख्येने प्रवासी लांबच लांब रांगांमध्ये अडकून राहिल्याचं चित्र होतं. या पार्श्वभूमीवर काही फ्लाईट्स उशीरा सोडण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. या साऱ्या परिस्थितीवर आता मुंबई एअरपोर्टने आपलं अधिकृत वक्तव्य जाहीर करत झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: VIDEO: मुंबई एअरपोर्टवर तोबा गर्दी; फ्लाइट मिस झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप

एअरपोर्टच्या प्रवक्तांनी म्हटलंय की, सणासुदींच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी मुंबई एअरपोर्टवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. देशातील इतर विमानतळांवरही असाच अनुभव दिसून आला आहे. गुप्तचर अहवालांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि राज्यातील दुसऱ्या विमानतळावर आलेल्या धमकीमुळे, मुंबई एअरपोर्टवरील सुरक्षा उपायांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आम्हाला प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई एअरपोर्टने प्रवाशांना सुरळीतपणे सेवा प्रदान करण्यासाठी तसेच सर्व सुरक्षा चौक्यांवर जलद वळण घेण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. याव्यतिरिक्त, सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कोरोना संक्रमणाला रोखण्याबाबत ठरवलेल्या सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन एअरपोर्ट करत आहे. कोणत्याही प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरपोर्टकडून खेद आहे आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या प्रयत्नात आहे, असं म्हणत त्यांनी प्रवाशांना आश्वस्त केलं आहे.

याव्यतिरिक्त, प्रवासी वाहतुकीमध्ये होणाऱ्या वाढीस लक्षात घेता प्रवाशांना अखंड सेवेचा अनुभव प्रदान करण्यासाठी, एअरपोर्टने 20 ऑक्टोबर, 2021 पासून टर्मिनल 1 उघडण्याचं ठरवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: उल्हास नदीचे प्रदूषण एमआयडीसीमुळेच! सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

दुसरीकडे नाराज प्रवाशांनी सोशल मीडियावर मात्र आपला संताप व्यक्त करुन दाखवला आहे. गायक विशाल दादलानीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मुंबई एअरपोर्टवर सध्या गोंधळांचं वातावरण आहे. असं वाटतंय की आम्ही मागच्या कोणत्यातरी युगात आहोत. लोकांची भरमसाठ गर्दी आहे. मशीन्स काम करु शकत नाहीयेत. सगळीकडे अव्यवस्था दिसून येत आहे. कर्मचारी आपल्या परिने योग्यरितीने काम करत आहेत मात्र तरीही ते गर्दीला नियंत्रित करु शकत नाहीयेत. ही अव्यवस्था कशामुळे पसरलीये, कृपया त्यांना टॅग करा.

loading image
go to top