सीएसएमटी-गोरेगाव लोकलचा वेग ५० किलोमीटर प्रति तास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Work

सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या लोकलला माहीम स्थानक परिसरात तीव्र वळणामुळे अनेक ठिकाणी ३० किमी प्रति तास आणि त्याहून कमी अशी लोकलची वेगमर्यादा होती.

सीएसएमटी-गोरेगाव लोकलचा वेग ५० किलोमीटर प्रति तास

मुंबई - रेल्वे रुळाच्या सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि लोकलचा वेग सुधारण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने माहीम स्थानकातील धोकादायक वळणाची तीव्रता कमी करण्याचे काम पूर्ण केले आहे. तसेच हार्बर मार्गावरून येणाऱ्या लोकलला माहीम स्थानकात दिला जाणारा 'तांत्रिक थाबा' सुद्धा काढून टाकला आहे. त्यामुळे आता सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अंधेरी आणि गोरेगाव लोकलच्या वेग आता माहीम स्थानकात २० वरून ५० किलोमीटर प्रति तास होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या लोकलला माहीम स्थानक परिसरात तीव्र वळणामुळे अनेक ठिकाणी ३० किमी प्रति तास आणि त्याहून कमी अशी लोकलची वेगमर्यादा होती. तसेच या धोकादायक वळणामुळे रेल्वे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनला तांत्रिक थाबा सुद्धा माहीम स्थानकात द्या लागत होता.

आता पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेनची सुरक्षितता वाढविण्याच्या आणि लोकलचा वेग सुधारण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने माहीम स्थानकातील डाउन हार्बर मार्गावरील दोन डायमंड क्रॉसिंग आणि ४ पॉइंट काढण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. तसेच माहीम येथे अप जलद मार्ग आणि डाउन हार्बर मार्गावरील अनावश्यक प्लॅटफॉर्म हटविण्यात आल्याने मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्वे लाईन टाकण्यासाठी जागाही उपलब्ध झाली आहेत. त्यामूळे सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अंधेरी आणि गोरेगाव लोकलच्या वेग आता माहीम स्थानकात २० वरून ५० किलोमीटर प्रति तास होणार आहे.

माहीम स्थानकात ३५ किमी प्रति तास अशी वेगमर्यादा होती, ती आता ५० किमी प्रति तास इतकी झाली आहे. वेग मर्यादेत बदल केल्यानंतर सरासरी ५ ते १० मिनिटे प्रवास वेळेत बचत होणार आहे. अनावश्यक प्लॅटफॉर्म काढल्याने मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्वे मार्गासाठी जागा उपलब्ध झाली आहे.

- सुनीत ठाकूर,मुख्य जनसंपर्क अधिकारी,पश्चिम रेल्वे

प्रवाशांच्या वेळ वाचनार

माहीम स्थानकातील अडथळे दूर केल्याने सीएसएमटी आणि वडाळा स्थानकांवरून गोरेगाव आणि अंधेरीपर्यत लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेच्या वेगमर्यादेत बदल केल्यानंतर सरासरी ५ ते १० मिनिटे प्रवासवेळेत बचत शक्य होणार आहे. अंधेरी ते गोरेगाव दरम्यानही वेगमर्यादा हटवल्यास आणखी काही मिनिटांची बचत होणार आहे.

Web Title: Csmt Goregaon Local Speed Increase Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..