

Central Railway's CSMT-Kurla 5th and 6th line project reaches final stage after 17 years
esakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी २००८-०९ मध्ये मंजूर झालेला सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्प तब्बल १७ वर्षांच्या विलंबानंतर अखेर निर्णायक टप्प्यात दाखल झाला आहे. प्रकल्पातील प्रमुख अडथळे ठरलेल्या भूसंपादन आणि अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने विद्याविहार ते परळ दरम्यानच्या ट्रॅकच्या उर्वरित कामासाठी २७.४३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष ट्रॅक कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.