
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो बांधव राज्यभरातून आझाद मैदानात दाखल झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सुरू झालेलं आंदोलन मुंबईत पोहोचलं आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन आंदोलकांचा आंदोलनावेळी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही आंदोलकांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. तर आज एका आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आला. पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यानं त्याला वाचवण्यात यश आलं.