CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

सीएसएमटी पुनर्विकासाच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
csmt Railway Station Mega Block

csmt Railway Station Mega Block

sakal

Updated on: 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या आठ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर किंवा ठाणे स्थानकातच संपविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com