
Mumbai: लोकल रुळावरुन घसरली; CSMT रेल्वे स्थानकात अपघात
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एक अपघात झाला आहे. लोकल रेल्वेचा एक डबा घसरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबई हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
पनवेल लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली. त्यावेळी या लोकलचा एक डबा घसरला. रेल्वे डेड एन्ड आणि प्लॅटफॉर्मलाही धडकली. हा डबा रुळावरुन बाहेर आला. अद्याप प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावर आता फक्त रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
या अपघातानंतर रेल्वे प्रशासन तातडीने कामाला लागलं आहे. दुरुस्तीचं काम त्वरीत सुरू करण्यात आलं आहे. तर प्रवाशांमुळे झालेली गर्दीही सांभाळण्याचं काम रेल्वे पोलीस करत आहेत. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सीएसएमटी पनवेल ही लोकल प्लॅटफॉर्म नंबर १ वरुन निघाली होती. मात्र ती त्याच प्लॅटफॉर्मच्या डेडएन्डला धडकली आणि एक डबा रुळावरुन बाहेर पडला. ही घटना सकाळी ९.३९ ला घडली आहे. मात्र या अपघातात कोणतीही दुखापत झालेली नाही. हार्बर लाईनच्या रेल्वे आता सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म नंबर २ वरुन जातील आणि काही उशिरा जातील, असं सुतार यांनी स्पष्ट केलं आहे.
Web Title: Csmt Railway Station Local Train Harbour Line Mumbai Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..