

CSMT station roof collapse
ESakal
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. सीएसएमटीच्या बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळून घटना घडली आहे. या घटनेत 2 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रवाशांची गर्दी असताना घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.