

CSMT Railway Station Redevelopment
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : युनेस्कोच्या वारसा सूचीतील भव्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे शंभराहून अधिक वर्षांची वास्तुकला, दगडी शिल्पांची दिमाखदार सजावट आणि दररोजच्या लाखो प्रवासाशांच्या धावपळीचे ठिकाण. या वारसास्थळाचे आधुनिक रूपांतर करून जागतिक दर्जाचे स्थानक उभे करण्याचे २,४५० कोटींचे स्वप्न मोठ्या घोषणांसह सुरू झाले, पण आज चित्र निराशाजनक आहे.