
Mumbai News : सीएसएमटीचा पुनर्विकास अडीच वर्षात होणार
मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील पाच महिन्यात काम सुरु करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकांचे पुनर्विकासाचे काम अडीच वर्षात पूर्ण केले जाणार आहेत.
मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) इमारत हे मुंबईत येणार्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. युनेस्कोने या इमारतीचा समावेश जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत केलेला आहे.
सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे या पुनर्विकास प्रकल्पात भारतीय रेल्वेने हाती घेतला आहे.ह्या प्रकल्पाला १८१३ कोटी रुपयाचा खर्च आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील अडीच वर्षात पुनर्विकासाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पुर्नविकासाचे काम हायब्रीड बील्ड ॲापरेट पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे ४० आणि खासगीची ६० टक्के गुंतवणुक असणार आहे.
सीएसएमटी स्थानकाच्या मध्यवर्ती रेल्वे मॉल प्रमाणे विकसित केले जाणार आहे. 2.54 लाख चौरस मीटरचा जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार, लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे.
त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व इतर सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहणार आहेत.
पुनर्विकासाचे वैशिष्ट्ये
- सीएसएमटी स्थानकाचे वैभव जतन केले जाणार
- सर्व प्रवासी सुविधांसह विक्रेते, कॅफेटेरियासाठी जागा, पादचारी पूल रेल्वे स्थानकात येण्या जाण्यासाठी स्वंत्रण ठिकाणे
- पार्किंगची सुविधा, रूफ प्लाझा आधुनिक सुविधांयुक्त प्लॅटफॉर्म, लिफ्ट / एस्केलेटर/ट्रॅव्हेलेटरची सुविधा दिव्यांगजनांसाठी सुविधा, सौरऊर्जा, जलसंवर्धन - पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन
- एकूण ३६ हेक्टर जागेत पुनर्विकास