csmt railway station
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासामुळे आता लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ गेल्या सात महिन्यांपासून बंद असतानाच, आता १४ आणि १५ क्रमांकाचे प्लॅटफॉर्मही ताब्यात देण्याची मागणी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) केली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद झाल्यास सीएसएमटीवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या परिचालनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.