CST Bridge Collapse: पूल ओलांडताना देवाचा धावा; 18 पैकी 11 पूल कधीही कोसळण्याचा धोका

CST Bridge Collapse: पूल ओलांडताना देवाचा धावा; 18 पैकी 11 पूल कधीही कोसळण्याचा धोका

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा हिमालय पूल कोसळल्यानंतर उपनगरीय रेल्वेच्या पुलांवरून चालताना प्रवाशी अक्षरशः देवाचा धावा करीत आहेत. रेल्वेचे १८ पैकी ११ पूल कधीही पडतील अशा स्थितीत आहेत. प्रशासकीय स्तरावर पूल बांधण्याची प्रक्रिया रेंगळण्याची दाट शक्‍यता आहे. बऱ्याच स्थानकांतील जुन्या पुलांना  आजही हादरे बसत आहेत. प्रवाशांची गर्दी झाल्यानंतर किंवा लोकलच्या हादऱ्याने रेल्ववरील पूल कंप पावत असल्याने सर्वांच्याच मनात धाकधूक आहे. रोजच पूल ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. असे धोकादायक पूल पाडून ते नव्याने कधी बांधणार, असा प्रश्‍न प्रवाशांकडून केला जात आहे. 

रेल्वे आणि पालिका प्रशासनाने पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामात दिरंगाई केल्यास पुन्हा दुर्घटना घडण्याची भीती आहे. धोकादायक पुलांचा अहवाल एक महिन्यानंतर येणार आहे. त्यानंतर पुलांच्या निविदा प्रक्रियेला वेळ लागणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत किती महिने लागतील त्याचा अंदाज नाही. हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ११ पूल धोकादायक स्थितीत तर ६१ पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

पुनर्बांधणी लांबणार
अहवालानुसार मुंबईतील १८ पूल अतिधोकादायक असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले होते. मरिन लाइन्स स्थानकाजवळचा चंदनवाडीतील पूल, सांताक्रूझ स्थानकाजवळील हंस भुर्गा मार्गावरील पूल, गोरेगावमधील वालभट नाल्यावरील पूल, कांदिवलीतील रामनगर चौकातील पूल आदींची त्यात गणना होते. टिळक नगर स्थानकातील पूल, यलो गेट परिसरातील पूल आणि मालाडमधील गांधीनगरचा पूल पाडण्यात आला आहे; परंतु अजूनही ११ पूल धोकादायक  स्थितीत उभे आहेत. दरम्यान, हिमालय पूल दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आता सर्वच पुलांची पुन्हा तपासणी होणार आहे. हिमालय पूल धोकादायक स्थितीत नसल्याचा अहवाल ऑडिटर डी. डी. देसाई यांनी दिला होता. तरीही पूल पडून पाच जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे मुंबईतील सर्वच पुलांची तपासणी केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतर त्यांच्या पुनर्बांधणीचा निर्णय लांबण्याची दाट  शक्‍यता आहे.

ऑडिटची आजपासून अंमलबजावणी
धोकादायक स्थितीत असलेले १८ पूल वगळता मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागणारे ६१ पूल आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ते पूलही धोकादायक होण्याची भीती आहे. रेल्वेचे ११० पूल उत्तम स्थितीत आहेत. मुंबईतील २९६ पुलांचे परत स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या निर्णयाची सोमवार (ता. १८) पासून अंमलबजावणी होण्याची शक्‍यता असून त्याबाबत तातडीची बैठक होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com