सीएसटीला नवी झळाळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

विद्युत रोषणाई बदलणार; दक्षिणेकडील बाजूचे होणार सौंदर्यीकरण  

मुंबई - जागतिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या विद्युत रोषणाईत बदल करण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए. के. श्रीवास्तव यांनी नुकतीच केली. सीएसटीचे वास्तुविशारद एफडब्ल्यू स्टीव्हन्स यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.

सीएसटी स्थानकाची वास्तू जागतिक हेरिटेजच्या यादीत स्थान पटकावून आहे. विविध सणांनिमित्त सीएसटी स्थानकात होणाऱ्या रोषणाईने डोळ्यांचे पारणे फिटते. या ऐतिहासिक वास्तूचे निर्माते एफडब्ल्यू स्टीव्हन्स यांच्या जन्मदिनानिमित्त मध्य रेल्वेने शुक्रवारी कार्यक्रम घेतला होता. त्या वेळी महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वास्तुविशारद स्टीव्हन्स यांच्यावर राजेश लाटकर यांनी बनवलेली डॉक्‍युमेंट्री दाखवण्यात आली.

या महान वास्तुविशारदाने मुंबईत ३३ वर्षे वास्तव्य केले. या कारणास्तव ते इंग्लंडमध्ये परिचित नव्हते; पण त्यांच्या वास्तुकलेमुळे ते भारतात प्रसिद्ध झाले, असे लाटकर म्हणाले. त्याप्रमाणे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌चे प्राध्यापक मुस्तनसर दळवी व वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी सीएसटीच्या वास्तुकलेचे महत्त्व सांगितले.

महापालिकेबरोबर काम
सीएसटीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेबरोबर काम सुरू असल्याचे स्पष्ट करत या वास्तूच्या विद्युत रोषणाईची रचना बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सीएसटी स्थानकाची आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या दक्षिणेकडील बाजूचे सौंदर्यीकरण पालिकेच्या सहकार्याने केले जाणार आहे. पदपथावरील फेरीवाल्यांना हटवण्यात येईल. जुने दस्तऐवज जतन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

Web Title: cst development