गँगस्टर रवी पुजारी येत्या 10 दिवसात मुंबईत येण्याची शक्यता

अनिश पाटील
Tuesday, 17 November 2020

बंगळुरू न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता मुंबई गुन्हे शाखा आठवड्यारात गँगस्टर रवी पुजारीला आणण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

मुंबई, ता. 17 : बंगळुरू न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता मुंबई गुन्हे शाखा आठवड्यारात गँगस्टर रवी पुजारीला आणण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या मागणीवरून शुक्रवारी बंगळुरू येथील न्यायालयाने पुजारीला दहा दिवसांच्या कोठडीची मंजुरी दिली आहे. दीड वर्षांपूर्वी पुजारीच भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. मंजुरी मिळाल्यानंतर गुन्हे शाखा आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून आठवड्यारात ती पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर पुजारीचा ताबा मुंबई पोलिस घेणार आहेत.

महत्त्वाची बातमी : प्रेयसीचा गळा चिरून; स्वतःच्याच तोंडात फोडला सुतळी बॉम्ब; मालाडमधील धक्कादायक घटना

पुढील 10 दिवसांत मुंबईतील खटल्याच्या कारवाईसाठी त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. खंडणी विरोधी पथकाला त्याचा ताबा घेणार आहे. 2015 च्या हत्येप्रकरणी हा ताबा देण्यात येणार आहे. रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत 49 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 26 गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. 2017-18 मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. 2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते.

पुजारी सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. बंगळूरुत 39, मंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा पुजारीच्या विरोधात दाखल आहे. पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाची बातमी : 'बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज'; वीजबिलप्रकरणी भाजप नेत्याचा घणाघात

मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारी विश्‍वातील हालचालींची तातडीने माहिती घेणे आवश्‍यक आहे. 10 दिवस पुजारी खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात राहिल. त्यासाठी रवी पुजारी याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतील. 

( संपादन - सुमित बागुल )

custody of gangster ravi pujari will be given to mumbai police within 10 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: custody of gangster ravi pujari will be given to mumbai ATS police within 10 days