Mumbai News : अंधेरीत हॉटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण; 4 आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Customer brutally beaten hotel staff Andheri 4 accused arrested crime mumbai police

Mumbai News : अंधेरीत हॉटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण; 4 आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईतील अंधेरी भागात हॉटेल चालक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हॉटेल बंद झाल्यानंतर जेवणाची मागणी करणाऱ्या तीन ग्राहकांना मारहाण केल्याप्रकरणी अंधेरीतील एका रेस्टॉरंटच्या चार वेटर्सना मंगळवारी अटक करण्यात आली.

विनोद यादव, प्रमोद पुजारी,दीपक कपुरवन, अरविंद चौरसिया अशी आरोपीची नाव आहेत मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये 7 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली, अशी माहिती एमआयडीसी पोलिसानी दिली आहे.

सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पीडितेचा माग काढला. या व्हिडिओमध्ये आरोपी वेटर्स बांबूच्या काठीने तीन जणांवर हल्ला करताना दिसत आहे.

रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर तक्रारदारासह त्याचा भाऊ आणि अन्य एका नातेवाईकाने जेवणाची मागणी केली. परंतु रेस्टॉरंट मालकाने तक्रारदाराला शाब्दिक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच वादात रूपांतर होत हॉटेलच्या वेटर्सने वादात उडी घेत तिघांना मारहाण केली. आरोपींना कलम 324 आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.